
“औषधांसाठी मार्गदर्शन आणि प्रतिजैविकांसाठी डॉक्टरांची गरज आहे.”
प्रतिजैविके ही अशी औषधे नाहीत जी विचार न करता घ्यावीत. त्यांचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच केला पाहिजे. आजकाल लोक असे मानू लागले आहेत की फक्त एक गोळी घेतली की सगळा त्रास दूर होईल. यामुळेच आजार आणि संसर्ग या प्रतिजैविकांवर भारी पडत आहेत. मी तुम्हा सर्वांना आग्रहाने सांगतो की कृपया स्वतःच्या मनाने औषधे घेणे टाळा. प्रतिजैविकांच्या बाबतीत तर याकडे लक्ष देणे खूपच महत्त्वाचे आहे. मी एवढेच म्हणेन — औषधांसाठी मार्गदर्शन आणि प्रतिजैविकांसाठी डॉक्टरांची गरज आहे. ही सवय तुमचे आरोग्य सुधारण्यात खूप उपयुक्त ठरेल.













































